Hot Posts

6/recent/ticker-posts

Recruitment Drive for Group-D: महाराष्ट्र शासनाने कोल्हापूर येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय येथे गट-ड (वर्ग-४) संवर्गातील पद भरती

 महाराष्ट्र शासनाने कोल्हापूर येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय येथे गट-ड (वर्ग-४) संवर्गातील पदे सरळसेवेने भरण्याची जाहिरात दिली आहे. यासंबंधित महत्वाच्या तपशील खालीलप्रमाणे आहेत:

महाराष्ट्र राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधीद्रव्ये विभाग मंत्रालय, मुंबई अधिनस्त संचालनालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई अंतर्गत राजर्षि छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय यांच्या आस्थापनेवरील व कक्षेतील गट-ड (वर्ग-४) संवर्गातील खालीलप्रमाणे विविध रिक्त पदे सरळसेवेने भरण्याकरिता पात्र उमेदवारांकडून फक्त ऑनलाईन फदतीने (Computer Based Test) स्पर्धा परिक्षेसाठी दिनांक- ३१/१०/२०२४ पासून दिनांक २०/११/२०२४, २३:५९ वाजेपर्यंत या कालावधीत विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. सदरची पूर्ण प्रक्रिया आय.बी.पी.एस., या कंपनीमार्फत करण्यात येणार असून अर्ज सादर करण्याबाबतचे अधिकृत संकेतस्थळाबाबतची माहिती www.rosmgmc.ac.in या संकेतस्थळावर यथावकाश उपलब्ध करुन देण्यात येईल. उमेदवारास प्रत्येक पदाकरिता स्वतंत्र अर्ज करावा लागेल, उमेदवारांची शैक्षणिक अर्हता पदांचा तपशील शासनाच्या नियमानुसार संवैधानिक आरक्षण व समांतर आरक्षण, स्पर्धा परिक्षेचा अभ्यासक्रम आणि अर्ज करण्यासाठी मार्गदर्शक सुचना इत्यादीची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे.


चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती.👇👇👇

Official Notification PDF👉👉👉 Click Here

Official Website👉👉👉Click Here

महत्वाच्या तारखा:

  • अर्ज सुरु होण्याची तारीख: ३१ ऑक्टोबर २०२४
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख: २० नोव्हेंबर २०२४, रात्री ११:५९ वाजेपर्यंत

भरती प्रक्रिया:

  • या भरतीसाठी संगणक आधारित परीक्षा (CBT) होईल, जी आयबीपीएस (IBPS) संस्थेमार्फत घेतली जाईल.
  • अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीने स्वीकारले जातील.

अर्जाची माहिती:

  • अर्ज करण्यासाठी संकेतस्थळ: www.rosmgmc.ac.in (सर्व अधिकृत माहिती आणि अद्यतने येथे उपलब्ध होतील).
  • प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज: प्रत्येक इच्छुक उमेदवारास इच्छुक असलेल्या प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज करावा लागेल.

पात्रता आणि आरक्षण:

  • शैक्षणिक पात्रता: पदानुसार आवश्यक शैक्षणिक पात्रता महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार असेल.
  • आरक्षण: संवैधानिक आणि समांतर आरक्षण राज्य शासनाच्या नियमानुसार लागू असेल.

अभ्यासक्रम आणि मार्गदर्शक सूचना:

  • स्पर्धा परीक्षेचा अभ्यासक्रम, अर्ज मार्गदर्शक सूचना, आणि अन्य आवश्यक तपशील अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध केले जातील.

उमेदवारांनी संकेतस्थळावर नियमित तपासणी करावी, कारण सर्व सूचना, माहिती आणि आवश्यक बदल तेथे वेळोवेळी प्रकाशित केले जातील.

कोल्हापूर येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयातील वर्ग-४ पदांचे तपशील

Total Vacancy - 102


अर्ज सादर करण्याची प्रक्रिया आणि महत्वाच्या तारखा:

तपशीलदिनांक
जाहिरात प्रसिध्द होण्याचा दिनांकदि. ११/१०/२०२४
ऑनलाईन पध्दतीने अर्ज नोंदणी सुरु होण्याचा दिनांकदि. ३१/१०/२०२४
ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांकदि. २०/११/२०२४, रात्री २३:५९ वा.
ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम मुदतदि. २०/११/२०२४, रात्री २३:५९ वा.



परीक्षा शुल्क तपशील:
प्रवर्गपरीक्षा शुल्क
खुला प्रवर्गरु. 1000/-
राखीव प्रवर्गरु. 900/-


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या