NPCIL (न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड) ने 2024 साठी नवीन भरतीची घोषणा केली आहे. ही भरती ITI पास, डिप्लोमा धारक आणि ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी आहे. इच्छुक उमेदवार 3 ऑक्टोबर 2024 पर्यंत अर्ज करू शकतात.
चला तर मग जाणून घेऊ या संपूर्ण माहिती.👇👇👇
NPCIL (न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड) Vacancy 2024:
NPCIL Apprentice Recruitment 2024:
NPCIL भरती 2024: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (NPCIL) मध्ये अप्रेंटिसच्या जागा निघाल्या आहेत. या भरतीचे अधिकृत नोटिफिकेशन एनपीसीआयएलने आपल्या अधिकृत वेबसाइट वर जारी केले आहे. त्यानंतर 13 सप्टेंबरपासून या पदांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया देखील सुरू झाली आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 03 ऑक्टोबर 2024 आहे.
NPCIL भरती 2024 Notification Details:-
Vacancy Name | No. of Vacancy |
---|---|
Trade Apprentice | 50 |
Diploma Apprentice | 10 |
Graduate Apprentice | 10 |
Total | 70 |
महत्वाची माहिती:
- पदाचे नाव :- ITI प्रशिक्षु, डिप्लोमा प्रशिक्षु, ग्रॅज्युएट प्रशिक्षु
- अर्जाची शेवटची तारीख :- 3 ऑक्टोबर 2024
- पात्रता :- ITI, डिप्लोमा किंवा ग्रॅज्युएट पदवी (वेगवेगळ्या पदांसाठी पात्रता भिन्न असू शकते)
- विभाग :- न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (NPCIL)
- वय मर्यादा :- ट्रेड अप्रेंटिससाठी उमेदवारांचे वय किमान 18 वर्षे आणि कमाल वय पदानुसार 24-26 वर्षे असावे. वयाची गणना अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखेप्रमाणे 03 ऑक्टोबर 2024 रोजी केली जाईल.
- पगार :- ट्रेड अप्रेंटिसकडे जर एक वर्षाचा ITI कोर्स प्रमाणपत्र असेल, तर त्यांना प्रति महिना 7,700 रुपये, तर दोन वर्षांचा ITI कोर्स असल्यास 8,050 रुपये स्टायपेंड दिले जाईल. डिप्लोमा अप्रेंटिसला 8,000 रुपये आणि पदवीधर अप्रेंटिसला 9,000 रुपये मासिक स्टायपेंड दिले जाईल.
- निवड प्रक्रिया :- उमेदवारांची शॉर्टलिस्टिंग संबंधित ट्रेडमध्ये मिळालेल्या गुणांच्या टक्केवारीच्या आधारावर केली जाईल.
- अर्ज शुल्क :- या अप्रेंटिस रिक्त पदांसाठी उमेदवार विनामूल्य अर्ज करू शकतात.
0 टिप्पण्या