JNV प्रवेश 2025-26 साठी अर्ज ऑनलाईन 16 जुलै ते 23 सप्टेंबर 2024 दरम्यान सादर केला जाऊ शकत. NVS प्रवेश अर्ज 2025-26 सत्रासाठी navodaya.gov.in वर सादर केला जाऊ शकत होता. JNVST 2024 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 ऑक्टोबर 2024 पर्यंत वाढविण्यात आली आहे.
JNVST (Jawahar Navodaya Vidyalaya Selection Test):
Jawahar Navodaya Vidyalaya Selection Test:
Official Website 👉👉👉Click Here
JNVST 2025 महत्त्वाच्या तारखा :-
नवोदय विद्यालय समिती (NVS) ने JNVST 2025 (NVS इयत्ता-6 प्रवेश) अधिसूचना 16 जुलै 2024 रोजी जारी केली आणि 16 जुलै ते 7 ऑक्टोबर 2024 दरम्यान ऑनलाइन अर्ज मागवले. JNVST 2025 प्रवेश परीक्षा 18 जानेवारी 2025 रोजी होणार आहे. डोंगराळ भागांसाठी JNVST 2025 परीक्षा 12 एप्रिल 2025 रोजी होईल.
जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश 2025 हे केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या स्वायत्त शिक्षण संस्थेद्वारे आयोजित केले जाते. यामध्ये इयत्ता सहावीपासून बारावीपर्यंत गुणवंत विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण, निवास, भोजन, आणि इतर सुविधा दिल्या जातात.
पात्रता :-
1. अर्जदार विद्यार्थ्याने इयत्ता पाचवी मध्ये शिकत असणे आवश्यक आहे.
2. अर्जदाराला त्याच्या स्वतःच्या जिल्ह्यातून प्रवेश घ्यावा लागेल.
3. वयोमर्यादा पूर्ण असणे अनिवार्य आहे.
4. प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या लेखी परीक्षेच्या आधारावर गुणवत्तेनुसार निवड होते.
प्रवेश प्रक्रिया :-
- अर्ज भरण्याची प्रक्रिया दरवर्षी स्थानिक शाळांमधून किंवा अधिकृत वेबसाइटवर केली जाते.
- प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षण, निवास, भोजन, गणवेश, पाठ्यपुस्तके, आणि लेखनसामग्री यासारख्या सर्व सुविधा विनामूल्य मिळतात.
- परीक्षेच्या अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे :-
- जन्म प्रमाणपत्र
- रहिवासी प्रमाणपत्र
- जात प्रमाणपत्र (जर लागू असल्यास)
- दोन छायाचित्रे
आरक्षण :-
- जवाहर नवोदय विद्यालयात 75% जागा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी राखीव आहेत.
- या शाळांमध्ये इयत्ता सहावीमध्ये प्रवेश घेतल्यानंतरच पुढील वर्गांमध्ये प्रवेश मिळू शकतो.
JNVST (Jawahar Navodaya Vidyalaya Selection Test) 2025 परीक्षेचा नमुना खालीलप्रमाणे आहे :-
परीक्षेचा स्वरूप :-
1. प्रश्न प्रकार :- बहुपर्यायी प्रश्न (Multiple Choice Questions)
2. मध्यम :- मराठी/इंग्रजी किंवा इतर स्थानिक भाषा (राज्याच्या माध्यमानुसार)
3. विषय :- परीक्षेत तीन मुख्य विषयांवर प्रश्न विचारले जातात.
- मानसिक क्षमता चाचणी (Mental Ability Test - MAT)
- अंकगणित (Arithmetic)
- भाषा चाचणी (Language Test)
एकूण गुण :- 100 गुण
परीक्षेची वेळ :- 2 तास (120 मिनिटे)
1. मानसिक क्षमता चाचणी (Mental Ability Test)
- प्रश्नसंख्या: 40
- गुण: 50
- वेळ: 60 मिनिटे
- या विभागात विविध आकृती, क्रम, आणि दृश्य प्रश्न विचारले जातात जे विद्यार्थ्यांची तर्कशक्ती तपासतात.
2. अंकगणित (Arithmetic)
- प्रश्नसंख्या: 20
- गुण: 25
- वेळ: 30 मिनिटे
- या विभागात गणितीय उदाहरणे, गणना, वेळ आणि गती इत्यादी प्रश्न विचारले जातात.
3. भाषा चाचणी (Language Test)
- प्रश्नसंख्या: 20
- गुण: 25
- वेळ: 30 मिनिटे
- या विभागात भाषेशी संबंधित प्रश्न विचारले जातात, जसे की वाचन समज, व्याकरण इत्यादी.
एकूण तपशील :-
- प्रश्नसंख्या: 80
- एकूण गुण: 100
- वेळ: 120 मिनिटे परीक्षेत निगडीत वेळेच्या अंतर्गत सर्व प्रश्नांची उत्तरे देणे आवश्यक आहे.
नवोदय विद्यालय प्रवेश 2024 साठी कसे अर्ज करावे
JNVST-2025 (JNV इयत्ता-6 प्रवेश) साठी अर्ज करण्यासाठी खालील चरणांचे पालन करा.
1. वेबसाइट navodaya.gov.in ला भेट द्या.
2. मग मेनू बारमधील प्रवेश टॅबवर क्लिक करा.
3. नंतर उप-मेनूमध्ये प्रवेश अधिसूचना वर क्लिक करा.
4. त्यानंतर एक नवीन पृष्ठ उघडेल जिथे JNV प्रवेश अधिसूचना आणि ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक दिली आहे.
5. लिंकवर क्लिक करा.
6. एक नवीन वेबपृष्ठ उघडेल, ज्याचा URL https://cbseitms.rcil.gov.in/nvs/ असा असेल.
7. NVS प्रवेश 2024 संबंधित सर्व तपशील जसे की अधिसूचना PDF, नोंदणी लिंक, मागील वर्षांचे पेपर्स, विविध प्रारूप इत्यादी तिथे दिलेले आहेत.
8. NVS प्रवेश 2024 नोंदणी प्रक्रिया पूर्ण करा आणि ऑनलाइन अर्ज फॉर्म भरा.
9. फॉर्म सबमिट करा आणि त्याची प्रिंटआउट घ्या.
0 टिप्पण्या