HOMEGUARD Bharti:
Sr. | जिल्हा | अर्ज भरण्याचा कालावधी |
---|---|---|
1. | सातारा | दि. 15/07/2024 ते 31/07/2024 |
2. | नांदेड | दि. 25/07/2024 ते 14/08/2024 |
3. | रत्नागिरी | दि. 25/07/2024 ते 14/08/2024 |
4. | जळगाव | दि. 25/07/2024 ते 14/08/2024 |
5. | चंद्रपूर | दि. 25/07/2024 ते 10/08/2024 |
6. | यवतमाळ | दि. 26/07/2024 ते 17/08/2024 |
7. | सिंधुदूर्ग | दि. 25/07/2024 ते 14/08/2024 |
8. | धुळे | दि. 25/07/2024 ते 14/08/2024 |
9. | हिंगोली | दि. 25/07/2024 ते 14/08/2024 |
10. | अमरावती | दि. 25/07/2024 ते 05/08/2024 |
11. | बीड | दि. 26/07/2024 ते 16/08/2024 |
12. | धाराशिव | दि. 25/07/2024 ते 14/08/2024 |
13. | वाशिम | दि. 26/07/2024 ते 14/08/2024 |
14. | भंडारा | दि. 26/07/2024 ते 16/08/2024 |
1. पदाचे नाव आणि जागा :-
होमगार्ड भरती 2024 अंतर्गत विविध जिल्ह्यांमध्ये होमगार्ड पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. प्रत्येक जिल्ह्याच्या रिक्त पदांची संख्या भिन्न असू शकते, त्यामुळे अधिकृत अधिसूचनेत जिल्हानिहाय पदांची माहिती दिली जाईल.
2. शैक्षणिक पात्रता:
- उमेदवार किमान 10वी पास असणे आवश्यक आहे.
- 10वीची परीक्षा सरकारी मान्यताप्राप्त बोर्ड किंवा संस्थेतून उत्तीर्ण असलेली असावी.
- उच्च शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाऊ शकते, परंतु 10वी ही आवश्यक पात्रता आहे.
अर्ज करण्याची प्रक्रिया:
- अर्ज ऑनलाइन पद्धतीने करावा लागेल.
- अर्ज करण्यासाठी संबंधित राज्याच्या होमगार्ड विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
- वेबसाइटवर दिलेल्या अर्ज फॉर्ममध्ये सर्व आवश्यक माहिती भरावी आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील.
नियम व अटी :-
१. होमगार्ड पात्रतेचे निकष :-
अ) शैक्षणिक पात्रता :-
उमेदवाराने किमान १० वी उत्तीर्ण (SSC) असणे आवश्यक आहे.
ब) शारीरिक पात्रता :-
वयोमर्यादा :- उमेदवाराचे वय २० वर्षे पूर्ण ते ५० वर्षांच्या आत असावे (दि. ३१/०७/२०२४ रोजी).
उंची :- • पुरुष उमेदवारांसाठी किमान १६२ से.मी.
• महिला उमेदवारांसाठी किमान १५० से.मी.
• छाती (फक्त पुरुष उमेदवारांसाठी): न फुगविता किमान ७६ से.मी.
कमीत कमी ५ से.मी. फुगविणे आवश्यक आहे.
क) आवश्यक कागदपत्र :-
1. रहिवासी पुरावा :- आधार कार्ड, मतदान ओळखपत्र.
2. शैक्षणिक अहर्ता प्रमाणपत्र:
१० वी उत्तीर्ण प्रमाणपत्र.
3. जन्मदिनांक पुरावा:
SSC बोर्ड प्रमाणपत्र / शाळा सोडल्याचा दाखला.
4. तांत्रिक अहर्ता :- तांत्रिक अहर्ता धारण करीता असल्यास तत्सम प्रमाणपत्र.
5. खाजगी नोकरी :- खाजगी नोकरी करीत असल्यास मालकाचे ना-हरकत प्रमाणपत्र.
6. चौकशी प्रमाणपत्र :- ३ महिन्यांच्या आतील पोलीस चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र.
उमेदवार ज्या भागातील रहिवासी आहे, तो भाग ज्या पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येतो, त्यांना त्याच पोलीस ठाणे आणि पथकामध्ये त्याच जिल्ह्यात अर्ज दाखल करता येईल.
इतर जिल्ह्यांतील अर्ज बाद ठरतील.
सामान्य सूचना:
अर्ज करण्यापूर्वी सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा.
अर्जाच्या मुदतीपूर्वी अर्ज करा.
कागदपत्रे योग्य प्रकारे स्कॅन करून अपलोड करा.
अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
येथे click करा:-अधिकृत वेबसाइटवर भेट द्या.
0 टिप्पण्या