Hot Posts

6/recent/ticker-posts

Maharashtra Tribal Development Recruitment 2024: आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र राज्य गट-ब व गट-क संवर्गातील भरती.

 आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र राज्यात गट-ब (अराजपत्रित संवर्ग) व गट-क संवर्गातील रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या प्रक्रियेत विविध पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज भरण्याची सुविधा 12 ऑक्टोबर 2024 पासून उपलब्ध होईल आणि अर्ज भरण्याची अंतिम तारीख 2 नोव्हेंबर 2024 आहे.

पदांसाठीची निवड प्रक्रिया ऑनलाईन परीक्षेद्वारे होणार असून, परीक्षेची तारीख संबंधित संकेतस्थळावर जाहीर केली जाईल.

Tribal Development Recruitment:

Maharashtra Tribal Development:

Maharashtra Adivasi vikas vibhag Bharti:

चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती.👇👇👇

Official Notification PDF👉👉👉 Click Here

Official Website👉👉👉Click Here

आदिवासी विकास विभागात भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदांची यादी खालीलप्रमाणे आहे. ही पदे गट-ब (अराजपत्रित संवर्ग) आणि गट-क संवर्गातील आहेत:

गट-ब संवर्गातील पदे: 

  1. वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक
  2. सहाय्यक संशोधन अधिकारी
  3. उपलेखापाल
  4. मुख्य लिपिक-सांख्यिकी सहाय्यक
  5. वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक (नॉन-पेसा)
  6. वरिष्ठ लिपिक-सांख्यिकी सहाय्यक
  7. कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी

गट-क संवर्गातील पदे:

  1. लघुटंकलेखक (शॉर्टहँड टायपिस्ट)
  2. गृहपाल (रात्री गृहपाल पुरुष)
  3. अधिक्षक (रात्री अधिक्षक पुरुष)
  4. ग्रंथपाल
  5. राहाय्यक ग्रंथपाल
  6. प्रयोगशाळा सहाय्यक
  7. कॉमेरामन-कम-प्रोजेक्टर ऑपरेटर
  8. उच्चश्रेणी लघुलेखक
  9. निम्नश्रेणी लघुलेखक

वरील सर्व पदे सरळसेवेच्या माध्यमातून भरण्यात येणार आहेत.

रिक्त पदांसाठी अर्ज प्रक्रिया:

  • अर्ज भरण्याची सुरुवात: 12 ऑक्टोबर 2024, दुपारी 3:00 वाजता
  • अर्ज भरण्याची अंतिम तारीख: 2 नोव्हेंबर 2024, रात्री 11:55 वाजेपर्यंत

इथे दिलेल्या पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव यांचे तपशील पुढीलप्रमाणे आहेत:

1. वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक (वेतनश्रेणी एस-14)

  • किमान दुसऱ्या श्रेणीत कला, विज्ञान, वाणिज्य किंवा विधी पदवी किंवा शिक्षणशास्त्र किंवा शारीरिक शिक्षणातील पदवी आवश्यक आहे.
  • संस्थात्मक व्यवस्थापन, शैक्षणिक प्रशासन, तपासणी आणि छंद व खेळ यांमध्ये अनुभव असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.

2. संशोधन सहाय्यक (वेतनश्रेणी एस-14)

  • मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी आवश्यक आहे.
  • गणित, अर्थशास्त्र, वाणिज्य आणि सांख्यिकी या विषयातील पदवी असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.

3. उपलेखापाल-मुख्यलिपिक (वेतनश्रेणी एस-13)

  • मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी आवश्यक आहे.
  • पदव्युत्तर पदवी किंवा शिक्षणशास्त्रातील पदवी असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.

4. आदिवासी विकास निरीक्षक (वेतनश्रेणी एस-13)

  • मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी आवश्यक आहे.
  • पदव्युत्तर पदवी किंवा शिक्षणशास्त्रातील पदवी असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.

5. वरिष्ठ लिपिक-सांख्यिकी सहाय्यक (वेतनश्रेणी एस-8)

  • मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी आवश्यक आहे.
  • गणित, अर्थशास्त्र, वाणिज्य किंवा सांख्यिकी या विषयातील पदवी असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.

6. लघुलेखक (वेतनश्रेणी एस-8)

  • माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • शासकीय प्रमाणपत्र असावे जे कमीत कमी 80 शब्द प्रति मिनिट लघुलेखन आणि इंग्रजी व मराठी टंकलेखनात अनुक्रमे 40 व 30 शब्द प्रति मिनिट वेग आवश्यक आहे.

7. अधिक्षक (पुरुष) (वेतनश्रेणी एस-8)

  • समाजकाय, समाजकल्याण किंवा आदिवासी विकास शाखेतील पदवी असावी.

8. अधिक्षक (स्त्री) (वेतनश्रेणी एस-8)

  • समाजकाय, समाजकल्याण किंवा आदिवासी विकास शाखेतील पदवी असावी.

9. गृहपाल (पुरुष) (वेतनश्रेणी एस-14)

  • समाजकाय, समाजकल्याण किंवा आदिवासी विकास शाखेतील पदव्युत्तर पदवी असावी.

10. गृहपाल (स्त्री) (वेतनश्रेणी एस-14)

  • समाजकाय, समाजकल्याण किंवा आदिवासी विकास शाखेतील पदव्युत्तर पदवी असावी.

11. ग्रंथपाल (वेतनश्रेणी एस-8)

  • माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण व शासनमान्य संस्थेचे ग्रंथालय प्रशिक्षण प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
  • ग्रंथालय विज्ञानातील डिप्लोमा आणि दोन वर्षांचा ग्रंथालय कामाचा अनुभव असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.

12. सहायक ग्रंथपाल (वेतनश्रेणी एस-7)

  • माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण व शासनमान्य संस्थेचे ग्रंथालय प्रशिक्षण प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

13. प्रयोगशाळा सहाय्यक (वेतनश्रेणी एस-6)

  • माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

14. कॅमेरामन-कम-प्रोजेक्टर ऑपरेटर (वेतनश्रेणी एस-10)

  • उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण व फोटोग्राफीमधील डिप्लोमा असणे आवश्यक आहे.
  • संबंधित क्षेत्रात 3 वर्षांचा अनुभव असावा.

15. कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी (वेतनश्रेणी एस-13)

  • कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे.

16. उच्चश्रेणी लघुलेखक (वेतनश्रेणी एस-16)

  • इंग्रजी आणि मराठी लघुलेखनात कमीत कमी 120 शब्द प्रति मिनिट वेग आवश्यक आहे.

17. निम्नश्रेणी लघुलेखक (वेतनश्रेणी एस-15)

      

परीक्षा शुल्क:

  • अनारक्षित वर्गासाठी: 1000/-
  • मागासवर्गीय/आदिवासी दुर्गम क्षेत्र/अनाथ/दिव्यांग/माजी सैनिक: ₹ 900/- (10% सूट)

         शुल्क परत न मिळणारे (Non-refundable) आहे.

 

अर्ज प्रक्रिया:

  • उमेदवार कोणत्याही अपर आयुक्त कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील पदांसाठी अर्ज करू शकतो. अर्ज केलेल्या परीक्षेसाठी उपस्थित राहणे बंधनकारक आहे.
  • एका पेक्षा जास्त पदांसाठी अर्ज करायचा असल्यास प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज आणि स्वतंत्र शुल्क भरावे लागेल.
  • उमेदवारांनी अपर आयुक्त, नाशिक/अमरावती/ठाणे/नागपूर या चार कार्यालयांपैकी कोणत्याही एका कार्यालयात अर्ज करणे बंधनकारक आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या